नवी दिल्ली : मी खूष नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती आहे, असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले आयातशुल्क (टॅरिफ) पुन्हा एकदा वाढवणार असल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने याआधी भारत ावर २५ टक्के आयात शुल्क लादले होते. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अजून २५ टक्के आयातशुल्क लादण्यात आले. सध्या एकूण ५० टक्के आयातशुल्क भारतीय मालावर आकारले जात असताना आता पुन्हा आयातशुल्क वाढवण्याबाबत ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हा इशारा देण्यात आला आहे. ङ्गइंडिया टुडेफने याबाबत वृत्त दिले आहे. ट्रम्प काय म्हणाले ते जाणून घेऊ.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना भारतावर आणखी आयातशुल्क (टॅरिफ) लादणार असल्याचा इशारा दिला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हा इशारा देण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ङ्गङ्घपंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप उत्तम व्यक्ती आहेत. मी खूष नाही हे त्यांना माहिती आहे. मला खूष ठेवणं खूप महत्वाचं आहे. ते व्यापार करतात आणि आम्ही त्यांच्यावर लवकरच टॅरिफ (आयातशुल्क) लावू शकतो.फफ दरम्यान, अमेरिकेने भारतावर सध्या ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यामुळे युक्रेनविरूद्धच्या युद्धात रशियाला आर्थिक मदत मिळते, असा आरोप ट्रम्प नेहमी करतात. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील तेलाच्या साठ्यांवर अमेरिकेला थेट नियंत्रण हवे असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताला आणखी टॅरिफ वाढवण्याचा इशारा दिला आहे.
मोदी ट्रम्प फोनवर एकमेकांशी संवाद
अमेरिका व भारत यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू असून ती अद्याप पूर्ण झालेली नाही. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे शिष्टमंडळ नवी दिल्लीत व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी आले होते. परंतु, त्यातूनही व्यापार करारावर तोडगा निघाला नाही. ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत चर्चा सुरू असताना फोनवर एकमेकांशी संवाद साधला होता. अमेरिकेला व्यापारासाठी भारताची कृषी बाजारपेठ खुली हवी आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मका व इतर कृषीमाल अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत विकायचा आहे, परंतु, भारत सरकार त्यास तयार नाही, अशी माहिती अमेरिकेने दिल्लीत व्यापार करारावर चर्चा सुरू असताना दिली होती.
टॅरिफने दोन मिनिटांत प्रश्न सोडवू
अमेरिकेत भारत, चीन व थायलंडमधून मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात केला जातो, अशी माहिती ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये देण्यात आली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी भारतावर आक्षेप घेत भारतीय तांदूळावर आयातशुल्क लादणार असल्याचे म्हटले होते. ट्रम्प म्हणाले, अमेरिकेत भारताला तांदूळ पाठवण्याची परवानगी कोणी दिली? त्यांना आयातशुल्क (टॅरिफ) द्यावे लागेल. तांदळावरील आयातशुल्क त्यांना माफ आहे का? तेव्हा ट्रेझरी सचिव स्कॉट बेझेंट म्हणाल्या, भारताबरोबर या विषयावर व्यापार करार सुरू आहे. त्यावर पण त्यांनी (भारताने) असे करायला नको. आपण हा प्रश्न सोडवू. टॅरिफ दोन मिनिटांत हा प्रश्न सोडवेल असे ट्रम्प म्हणाले होते.